SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बबन, ख्वाडानंतर येणार ‘हा’ सिनेमा, सिनेमाचं पोस्टर रिलीज..

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘टीडीएम’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. भाऊराव कऱ्हाडे ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या यशानंतर आता त्यांचा येत्या 28 एप्रिल 2023 ला वेगळ्या धाटणीचा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पुन्हा एकदा त्यांनी या चित्रपटाचा संभ्रमात पाडणारा पोस्टर समोर आणला आहे. वास्तविकता दाखवणाऱ्या या पोस्टरमध्ये कोण अभिनेता असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या या आगामी ‘टीडीएम’ चित्रपटात दिग्दर्शनासोबत निर्मिती अशा दोन्ही जबाबदाऱ्या ते निभावत आहेत.

Advertisement

चित्रपटात कोण कोण असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कोण मुख्य भूमिकेत असेल हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. लवकरच याचा उलगडाही होणार आहे. कारण येत्या 28 एप्रिल 2023 ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र चित्रपटाच्या पोस्टरने उत्कंठा कमी होऊ दिलेली नाही.

‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ चित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्माते स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आहेत, असं इंस्टाग्रामवरील चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दिसत आहे. चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊराव कऱ्हाडे यांची आहे. चित्रपटाला वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी संगीत दिले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement