SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी

   मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी

राज्याची राजधानी मुंबईला दहशदवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा ई-मेल आला आहे. त्यामुळे एनआयएकडून (NIA) मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

Advertisement

 

 

अदानी समूहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स NSEच्या देखरेखीखाली

Advertisement

शेअर बाजारातील अस्थिरता रोखण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजने अदानी समूहावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट्स या तीन कंपन्यांच्या शेअर्सवर अतिरिक्त पाळत ठेवणार आहे. यामुळे अस्थिरता रोखण्यासाठी मदत होईल, अशी NSE ला अपेक्षा आहे.

 

Advertisement

 सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं : सत्यजीत तांबे

Advertisement

राज्यभर गाजलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी झाले. विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं आहे. मी पैसे वाटले नाहीत तर लोकांना प्रेम दिलं अशी भावना तांबे यांनी व्यक्त केली.

 महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात अडकली लग्नबंधनात*

Advertisement

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातने प्रियकर सुमित लोंढे याच्याशी लग्नगाठ बांधली. या शाही विवाह सोहळ्याला नातेवाईक व मित्र परिवाराच्या उपस्थितीत होते. महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम सुद्धा या दोघांच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली आहे. या जोडप्यावर आता चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Advertisement


  IPL सामने आता होणार 4K

आयपीएल 2023 च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला आहे. आता बीसीसीआयने आपल्या टेलिव्हिजन प्रेक्षकांसाठी चांगली सुविधा निर्माण करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने जियोच्या नेतृत्वातील स्पोर्ट्स 18 ला 4K व्हिडिओ फॉरमॅटमध्ये आयपीएल 2023 चे प्रसारण करण्याची परवानगी दिली आहे.

Advertisement

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement