अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच सर्व सामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ केली. दुधाचे वाढलेले दर आजपासून म्हणजेच 3 फेब्रुवारीपासूनच लागू होणार आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यास अवघ्या दोन दिवसातच महागाईच्या झळा बसायला सुरवात झाली आहे.
उत्पादन नवीन दर
अमूल ताजा 500 मिली 27
अमूल ताजा 1 लिटर 54
अमूल ताजा 2 लिटर 108
अमूल ताजा 6 लिटर 324
अमूल ताजा 180 मिली 10
अमूल गोल्ड 500 मिली 33
अमूल गोल्ड 1 लिटर 66
अमूल गोल्ड 6 लिटर 396
अमूल गायीचे दूध 500 मिली 28
अमूल गायीचे दूध 1 लिटर 56
अमूल A2 म्हशीचे दूध 500 मिली 36
अमूल A2 म्हशीचे दूध 1 लिटर 70
अमूल A2 म्हशीचे दूध 6 लिटर 420