जय जय महाराष्ट्र गीत वेळेचा विचार करता मोठं होत असल्याने ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचं दुसरं आणि तिसरं कडवं राज्यगीत म्हणून गायलं जाणार आहे. असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला हा निर्णय अंमलात येणार आहे.
महाराष्ट्राच्या या नवीन राज्यगीताचा बोर्डही मंत्रालयासमोर लावला जाणार आहे. सद्यस्थितीत देशातील केवळ 11 राज्यांचेच स्वत:चे असे गाणे आहे. यात आता महाराष्ट्र राज्याचेही स्वत:चे गीत असणार आहे. तसेच शालेय पुस्तकांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यगीताचा समावेश करण्यात येणार आहे.
तसेच ‘महाराष्ट्र शाहीर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत असणार आहे, अशीही माहिती मिळत आहे. अजय-अतुल हे या गाण्याला संगीतबद्ध करणार आहेत. याशिवाय अजय गोगावले हे गाणं गाणार आहेत. येत्या 28 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी मुख्य भूमिका साकारणार आहे.
दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक गीत असावे, असा ठराव करण्यात आला होता. त्यासाठी महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड झाली. राष्ट्रगीतानंतर आता राज्यात हे गीत गायले जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in