आमची बॅलन्सशीट मजबूत स्थितीत : गौतम अदानी
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तब्बल 28 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर अदानी एंटरप्रायजेसने 20 हजार कोटी रुपयांचा FPO मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर गौतम अदानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची बॅलन्स शीट मजबूत स्थितीत असून गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ नये यासाठी हा FPO मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं अदानी यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंमुळे PM मोदींचे स्वप्न अधुरे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडला, असा थेट आरोप रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे ठाकरे गटात संतापाचे वातारण पसरले आहे.
हायकोर्टाने शिवजयंतीच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली
आग्रा किल्ला परिसरात शिवजयंतीला परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी नाराज झाले आहेत. पुरातत्त्व विभागाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हि याचिका हायकोर्टात दाखल केली होती.
नाशिक पदवीधर मतदारसंघ मतमोजणीला सुरुवात
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. या निवडणुकीत 2 लाख 62 हजार 678 पैकी 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी हक्क बजावला आहे. याच पार्शवभूमीवर आज पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील अंतिम सामना काल पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर 168 धावांनी मात करत विजय नोंदवला. या सामन्यात भारताच्या शुबमन गिलने 126* धावा घेत चांगली कामगिरी केली आहे.