केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज पाचवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
– देशभरात 38 हजार 800 शिक्षकांची भरती होणार.
– वैद्यकीय शिक्षणासाठी 157 नवीन महाविद्यालये बांधण्यात येणार.
– पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली. आता या योजनेंतर्गत गरिबांना 2024 पर्यंत मोफत धान्य मिळणार.
– 2027 पर्यंत अॅनिमिया हा आजार मुळापासून समूळ नष्ट करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
– जुन्या करश्रेणीत 2.5 लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या 5 पर्यंत कमी करण्यात आली आहे. नव्या कर रचना स्वीकारणाऱ्यांना सात लाखापर्यंत कुठलाही कर लागणार नाही.
जुनी कररचना काय आहे?
3 लाखांपर्यंत – कोणताही कर नाही
3 ते 6 लाख – 5 टक्के
6 ते 9 लाख – 10 टक्के
9 ते 12 लाख – 15 टक्के
12 ते 15 लाख – 20 टक्के
15 लाखांहून जास्त – 30 टक्के
– गोबरधन योजनेंतर्गत 500 नवीन ‘वेस्ट टू वेल्थ’ प्लांटची स्थापना करण्यात येणार.
– अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत 3 वर्षात 47 लाख युवकांना स्टायपेंड देणार.
– सिनियर सिटीझन अकाऊंट स्कीम 4.5 लाखांवरून 9 लाख एवढी मर्यादा वाढवण्यात आली आहे.
– मोबाईल पार्ट्सच्या आयातीवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी होणार.
– महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट 2025 पर्यंत उपलबध होणार. विविध राज्यांमध्ये 33 स्किल डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी.
ऊर्जा विभागासाठी 50 हजार कोटींची तरतूद.
– देशात 200 बायोगॅस प्लांट उभारणार.
– कृषी कर्जाचे लक्ष 20 लाख कोटींपर्यंत वाढवणार.
– पॅन कार्ड वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केलं जाहीर.