आपल्यातील अनेकांकडे गाडी असेल तर तिला व्यवस्थित ठेवणे आपलं काम असतं. ती सुव्यस्थित राखण्यासाठी तिची वरचेवर सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळं गाडी किंवा कार सर्व्हिसिंग करत असताना या गोष्टीची काळजी जरुर घ्या.
गाडीसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्याचं इंजिन. त्यामुळं गॅरेजमध्ये गाडी सर्व्हिसिंगला दिल्यानंतर मेकॅनिक इंजिनसाठी कोणतं तेल वापरत आहे याची आवर्जून चौकशी करा. चुकीच्या इंजिन ऑईलमुळं गाडी खराब होण्याची शक्यता असते.
अनेकदा गोष्टी वरचढ सांगून किंवा सर्व्हिसिंगसाठी लागणाऱ्या वस्तूंची किंमत जास्त सांगितली जाते. खूप पैसे घेतले जातात. त्यामुळे सर्व्हिसिंगचे बिल नेहमी न विसरता मागत राहा. कार सर्व्हिसिंग करताना एअर फिल्टर साफ होते की नाही, याची देखील खात्री करुन घ्या.
गाडी किंवा कारमध्ये बॅटरीची गरज भासते. त्यामुळं बॅटरीचा उपयोग करताना कधीही लोकल बॅटरीचा वापर करु नका. लोकल बॅटरी अचानक खराब होऊ शकते. लोकल मार्केटमध्ये मिळणाऱ्या बॅटरीचे आयुष्यदेखील कमी असतं. त्यामुळं चांगल्या बॅटरीचा उपयोग करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in