जपानी वाहन निर्माता कंपनी टोयोटा किर्लोस्करने सीएनजी व्हेरिएंटमध्ये अर्बन क्रूझर हायराइडर गाडी लॉंच केली आहे. टोयोटाच्या सीएनजी प्रकारातील ही पहिली एसयूव्ही असणार आहे. या कारची सुरूवातीची किंमत (दिल्ली एक्स-शोरूम) 13.23 लाख रुपये आहे. कारचा सीएनजी प्रकार पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटपेक्षा 95 हजारांनी महाग आहे.
इंजिन कसं आहे आणि मायलेज किती?
Toyota Urban Cruiser HiRider E-CNG मध्ये 1.5-लिटर K-Series Dual-Jet, Dual VVT द्वि-इंधन पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन CNG मोडमध्ये 86.6 bhp पॉवर आणि 121.5 Nm टॉर्क जनरेट करते.
कार 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. त्याचे मायलेज 26.6 किमी/किलो आहे. त्याच वेळी, हेच इंजिन त्याच्या प्रतिस्पर्धी ग्रँड विटाराच्या CNG प्रकारात देखील उपलब्ध आहे. त्यामुळे दोन्ही कारच्या पॉवर, टॉर्क आणि मायलेजमध्ये कोणताही फरक नाही.
कंपनीने गाडीला अर्बन क्रूझर HiRider E-CNG असे नाव दिले आहे. ग्राहक 25 हजारांचे टोकन रक्कम देऊन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा जवळच्या डीलरशिपवर ते बुक करू शकतात. अर्बन क्रूझर हायराईडरची स्पर्धा मारुती सुझुकी ग्रँड विटारा सीएनजीशी होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in