‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
देशात सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. लवकरच विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक उपलब्ध झाल्यावर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल किंवा विद्यार्थी शाळेशीही संपर्क साधू शकतात. विद्यार्थी cbse.nic.in आणि cbse.gov.in या वेबसाईटवर जाऊन ते डाऊनलोड करू शकणार आहेत. तसेच बोर्डाने cbseacademic.nic.in वर इयत्ता 10वी आणि 12वीच्या अंतिम परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका, प्रश्न बँक आणि मार्किंग योजना प्रकाशित केल्या आहेत.
भारताचा जगभरात डंका!
जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 2023 हे वर्ष कठीण जाणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये मंदीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, अमेरिका, युरोप आणि चीनमधील आर्थिक घसरण होत आहे. तसेच, 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेतील अमेरिकेचा वाटा कमी होणार असल्याचेही IMFचे आकडे सांगत आहेत. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेतील वाटा 3.6 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
शाओमी इंडियाच्या प्रमुखांचा अचानक राजीनामा
जगभरातील आर्थिक संकटामुळे अनेक टेक कंपन्यांमध्ये नोकरकपात चालू आहे. आता भारतात शून्यातून करोडोंचा व्यवसाय उभारणाऱ्या स्मार्टफोन ब्रँड Xiaomi आणि तिच्या भारतीय शाखेचे माजी प्रमुख मनू कुमार जैन यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यांनी तब्बल 9 वर्षांनी राजीनामा दिला आहे. मनु कुमार जैन यांनी कंपनीत जवळपास 9 वर्षांच्या कार्यकाळात कंपनीसाठी मोठे योगदान दिले आहे. आता नवीन संधीकडे ते वाटचाल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मनू जैन यांनी 2014 मध्ये भारतात शाओमी ब्रँड लाँच करण्याचे नेतृत्व केले आणि ते त्याआधी ऑनलाईन शॉपिंग साईट Jabong चे सह-संस्थापकसुद्धा होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in