SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकार उद्योग समूहातर्फे महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्वांत भव्य लकी ड्रॉ चे आयोजन..

अहमदनगर – महाराष्ट्रात पहिल्यांदाच सरकार उद्योग समूहाद्वारे भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. या लकी ड्रॉ मध्ये विजेत्यांना देण्यात येणारी बक्षिसे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनला आहे. ड्रीम वर्ल्ड हे अहमदनगर मधील पाईपलाईन रोडवर नामांकित भव्य असे मेन्स वेअर कपड्यांचे दालन आहे. अतिशय कमी किंमतीत उच्च दर्जाच्या कपड्यांची निर्मिती येथे केली जाते.

सरकार उद्योग समुहाअंतर्गत चालणारे ड्रीम वर्ल्ड हे कपड्यांचे मॅनिफॅक्चुरींग आणि होलसेल युनिट आहे. वेगवेगळ्या व्हरायटी तसेच मेन्स वेअरसाठी प्रसिद्ध असलेले हे दालन सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, ड्रीम वर्ल्डद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या लकी ड्रॉ मध्ये महाराष्ट्रातील कपड्यांच्या दुकानदारांना लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे, दुकानदारांना प्रत्येक एक लाखाच्या खरेदीवर १ लकी ड्रॉ कुपन मिळणार आहे. याशिवाय, प्रत्येक ग्राहकास हमखास पैठणी, शेरवाणी आणि सोन्याची नथ अशी भेट देखील मिळणार आहे.

Advertisement

1 फेब्रुवारी ते 31 मार्च, 2023 या कालावधीमध्ये हा भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त दुकानदार आणि होलसेलर यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ड्रीम वर्ल्ड या दालनाचे मालक श्री. धीरजशेठ रसाळ पाटील यांनी केले आहे.

या लकी ड्रॉ मध्ये पहिले बक्षीस एन. एस. १२५ पल्सर, दुसरे बक्षीस होंडा शाईन बाईक, तिसरे बक्षीस स्प्लेंडर बाईक, चौथे बक्षीस ६४ इंचाचा एलईडी टीव्ही, पाचवे बक्षीस रेफ्रिजरेटर, सहावे बक्षीस वॉशिंग मशीन, सातवे बक्षीस सोफा सेट, आठवे बक्षीस आय-फोन वॉच तसेच ९ वे ते १५ वे बक्षीस वाय-फाय सीसीटीव्ही देण्यात येण्यात आहे. महाराष्ट्रात अधिकाधिक नाव-उद्योजक तयार व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याशिवाय, जे तरुण कापड व्यवसायात किंवा मेन्स वेअर मध्ये व्यवसाय करू इच्छितात त्यांना आम्ही यशस्वी उद्योजक बनवू असा विश्वास देखील सरकार उद्योग समूहाचे संस्थापक धीरजशेठ रसाळ पाटील यांनी व्यक्त केला आहे. या भव्य लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील नंबरवर आजच संपर्क करा – सरकार उद्योग समूह, महाराष्ट्र राज्य
7083249747, 7796157832

Advertisement