SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हिरो’ची नवीन स्कुटर लॉंच, किंमत व आकर्षक फीचर्स जाणून घ्या..

हिरो मोटोकॉर्पने बऱ्याच कालावधीनंतर आता शानदार स्कूटर झूम 110 (Xoom 110) सादर केली आहे. या स्कुटरसह कंपनी मार्केटमध्ये चांगलाच धुमाकूळ घालणार असल्याचं म्हटलं जातंय. या स्कुटरमध्ये ग्राहकांना तीन व्हेरिएंटचे पर्याय मिळणार आहेत. हिरो कंपनीने ही स्कूटर आकर्षक स्पोर्टी डिझाइनमध्ये लॉंच केली आहे.

Hero Xoom 110 ची व्हेरिएंटनुसार किंमत:

Advertisement

◆ Hero Xoom 110 LX – 68,599 रुपये
◆ Hero Xoom 110 VX – 71,799 रुपये
◆ Hero Xoom 110 ZX – 76,699 रुपये

कंपनीने हिरो झूम 110 ला त्यांच्या बाजारात असणाऱ्या इतर स्कूटरच्या रेंजपेक्षा खूप वेगळे ठेवले आहे. तसेच इंजिनबद्दल बोलायचं झालं तर हिरो झूममध्‍ये 110cc बीएस-6 प्रमाणित इंजिन आहे, जे उच्‍च कार्यक्षम राइडसाठी 7250 आरपीएममध्‍ये 8.05 बीएचपी आऊटपुट आणि 5750 आरपीएममध्‍ये 8.7 एनएम टॉर्क जनरेट करते.

Advertisement

कंपनीने या स्कुटर्सना स्पोर्टी डिझाइनसह सादर केले आहे ज्यामध्ये ‘X’ डिझाईनसह LED DRLs असलेल्या एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट देण्यात आले आहेत. तसेच स्कुटरच्या मागे कंपनीने X डिझाइनसह एलईडी टेल लॅम्प दिला आहे.
नवीन डिजिटल स्‍पीडोमीटरसह ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी व साइड-स्‍टॅण्‍ड इंजिन-कट-ऑफ स्‍कूटरच्‍या टेक प्रोफाइलमध्‍ये अधिक भर करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement