SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताची ‘ही’ गायिका जगात भारी, केला मोठा रेकॉर्ड!

अलका याग्निक त्यांच्या गाण्याने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांनी बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांच्या मधुर आवाजाने त्या नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.

आता गायिका अलका याग्निक यांनी मोठा विक्रम केला आहे. अलका याग्निक यांनी प्रसिद्ध गायक टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से या गायकांना पिछाडीवर टाकत सलग तिसऱ्या वर्षी 2022 मध्ये सर्वात जास्त ऐकलेल्या गाण्यांमध्ये अलका याग्निक यांची गाणी अग्रस्थानी आहेत. त्यामुळे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Advertisement

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिलेल्या माहीतीनुसार, गायिका अलका याज्ञिक यांच्या गाण्यांना 15.3 अब्ज स्ट्रीम रेकॉर्ड करण्यात आले आहे. त्यांच्यानंतर बॅड बन्नी 14.7 अब्ज स्ट्रीम्ससह दुसऱ्या नंबरवर आहे तर उदित नारायण यांनी 10.8 बिलियन, अरिजीत सिंहने 10.7 बिलियन आणि कुमार सानूने 9.09 बिलियन मिळवले आहेत.

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायिकेने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. ‘अगर तुम चाहो’, ‘परदेसी परदेसी’, ‘गजब का है दिन’, ‘ताल से ताल मिला’, ‘चुरा के दिल मेरा’, ‘सूरज हुआ मद्धम’, ‘अगर तुम साथ हो’ आणि ‘एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे’ यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी यांनी गायली आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement