💥 पाकिस्तानात आज एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याने बॉम्बस्फोटात मोठी जीवितहानी झाल्याचं समजतंय. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हा स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
👥 पाकिस्तानात पेशावरमधील पोलीस वसाहतीत 260 लोक असलेल्या एका मशिदीमध्ये नमाज सुरू असताना बॉम्बस्फोट झाल्यानं सर्वत्र धावपळ उडाली आहे. हा बॉम्बस्फोट आज (ता. 30 जाने) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडल्याची माहीती आहे. ही घटना पाहता अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.
💁🏻♂️ प्राप्त माहीतीनुसार, पेशावरमध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात अद्याप 32 जणांचा मृत्यू झाला आहे तर 147 जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या ठिकाणी पोलीस आणि तपास यंत्रणा पोहचल्या असून अधिक तपास सुरु आहे. याशिवाय हा हल्ला पोलिसांना टार्गेट करण्यासाठी होता, कारण या मशिदीत पोलिस जास्त संख्येने उपस्थित होते, अशी माहीती आहे.
📍 रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, आत्मघातकी बॉम्बस्फोट झाल्याने हा हल्ला दहशतवाद्यांकडून केला गेलेला मानला जात आहे. कारण यात नमाज सुरु असतानाच अचानक मशिदीत पहिल्या रांगेत असलेल्या एका हल्लेखोरानं बॉम्बने स्वत:ला उडवल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर बॉम्बस्फोत झाल्यानंतर मशिदीचं छत कोसळलं आहे. या हल्ल्यातील मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in