गेल्या काहीदिवसांपासून देशात गव्हाच्या किंमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खुल्या बाजारात 30 मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गव्हाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. अशातच आता तांदळाच्या किंमती देखील कमी होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारनं आता तांदूळ खरेदीबाबत नवीन नियमावली जारी केली आहे.
राज्य सरकारे भारतीय अन्न महामंडळाकडून 3 हजार 400 रुपये प्रति क्विंटल दराने तांदूळ खरेदी करू शकता. त्यामुळे राज्यांना आता 34 रुपये किलो दराने तांदूळ मिळणार आहे. राज्यातील गरिब लोकांच्या विकासासाठी राज्य सरकारने अनेक योजना राबवत आहेत. या योजनांसाठी राज्य सरकारला भारतीय अन्न महामंडळाकडून 34 रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करता येईल, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. त्यामुळे तांदळाचे दार स्वस्त होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्राने राज्य सरकारनं सूचना दिल्या आहेत.