अमेरिका आणि चीनमध्ये होणार युद्ध?
अमेरिकेच्या हवाई दलाच्या एका जनरलच्या दाव्याने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. येत्या दोन वर्षांत अमेरिका आणि चीनमध्ये भयंकर युद्ध होऊ शकते. युद्धाच्या शक्यता वाढत आहेत. एवढेच नाही तर लष्करातील अधिकाऱ्यांना युद्धाच्या तयारीचा इशाराही दिला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी PM मोदी घेणार मंत्रिमंडळाची बैठक
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान मोदी आज मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. 2023 या नव्या वर्षातील ही पहिली बैठक आहे. मोदींच्या अध्यक्षतेतील या बैठकीत केंद्र सरकारमधील सर्व केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री सहभागी असतील.
प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता, अवघ्या 10 टक्के नागरिकांचा बूस्टर डोसला प्रतिसाद
कोरोनाची तीव्रता कमी होताच मराठवाड्यात प्रतिबंधक लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 83.96 टक्के नागरिकांनी पहिला, तर 68 टक्के जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर तिसऱ्या लाटेदरम्यान सुरू केलेल्या बूस्टर डोसला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, केवळ 10 टक्केच लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे.
राखी सावंतच्या आईचं निधन
ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगामुळे राखी सावंत हिची आई जया भेडा यांचा मृत्यू झाला आहे. तब्बल दोन महिने रुग्णालयात मृत्यूशी त्यांनी झुंज दिली. परंतु काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. अखेरच्या दिवसात जया भेडा यांची तब्येत अत्यंत बिघडली होती. आणि त्यांची काल त्यांची प्राणज्योत मालवली.
शेफाली वर्मा इतिहास रचण्यासाठी सज्ज!
शेफाली वर्माच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघाला आज इतिहास रचण्याची संधी आहे. १९ वर्षांखालील महिलांच्या विश्वकरंडकाची अंतिम लढत आज रंगणार असून भारतासमोर इंग्लंडचे आव्हान आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दोन्ही देश विश्वविजेता होण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत.