महिला विश्वकरंडक विजेतेपदासाठी चुरस :
आज 19 वर्षांखालील महिलांच्या विश्वकरंडकाची अंतिम लढत रंगणार असून भारतासमोर इंग्लंडचे आव्हान आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दोन्ही देश विश्वविजेता होण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत. आजचा सामना भारतीय महिला संघ शेफाली वर्मा यांच्या नेतृत्वात खेळला जाणार आहे.
कधी होणार सामना : आज (29 जाने.)
किती वाजता होणार सामना : आज सायंकाळी 5.15 वाजता
कुठे आहे सामना : फॅन कोडवर
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना :
अशातच भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. पण भारताने पहिलाच टी20 सामना गमावल्यामुळे मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आज भारत विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे.
कधी होणार सामना : आज (29 जाने.)
किती वाजता होणार सामना : भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता
कुठे आहे सामना : लखनौ. श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम