SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारवाढ करण्याच्या तयारीत केंद्र सरकार..

🛅 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण लवकरच आर्थिक बजेट 2023 सादर करणार आहेत. या बजेटमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

👨🏻‍💼 सरकारी कर्मचाऱ्यांनी केंद्राकडं तीन मागण्या केल्या आहेत. केंद्र सरकारने जर या बजेटमध्ये या मागण्या मान्य केल्या तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ बघायला मिळू शकते. यामुळं डीए, डीएची थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टकरमध्ये देखील वाढ करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

👉 कोरोना काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 18 महिने थकला होता. त्यामुळे थांबवण्यात आलेल्या या डीएची थकबाकी लवकरात लवकर मिळावी, ही कर्मचाऱ्यांची पहिली मागणी असणार आहे. डीए मध्ये सरकार वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

👉 फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार 18,000 वरुन 26,000 होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये 2.57 टक्क्यांवरुन 3.68 टक्के वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली गेली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement