वीजदर पुन्हा इतक्या रुपयांनी वाढण्याची शक्यता
महावितरण कंपनीने वीज युनिटचे दर वाढवण्याची मागणी केली आहे. महावितरणाने केलेल्या याचिकेत तब्बल 37 टक्के दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार विजेची किंमत 2.55 रुपये प्रति युनिट एवढी वाढणार आहे.
पदवीधर मतदारसंघात मतदानाच्या दिवशी मद्य विक्रीची दुकाने बंद राहणारपुढील आठवड्यात, 30 जानेवारी रोजी राज्यात पदवीधर मतदार संघाची निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदानाच्या दिवशी मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.
हवामान बदलाचा फटका राज्यातील साखर उद्योगाला बसण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या हवामान बदलाचा फटका राज्यातील साखर उद्योगाला बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी विक्रमी साखर उत्पादन करीत जगात तिसरे स्थान पटकाविणाऱ्या महाराष्ट्रातील साखरेच्या उत्पादनात यंदा मात्र सुमारे 12 ते 15 लाख मेट्रीक टनांची घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सोने महागले तर चांदीच्या किंमती स्थिर
गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या बाजारभाव गगनाला भिडत आहेत. अशातच आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 52,650 रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 52,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर चांदी 72,600 रुपये प्रति किलो आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 72,500 रुपये प्रतिकिलो होती.
एम. एस. धोनीचा ‘लेट्स गेट मॅरिड’ चित्रपट येणार..
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आता मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. आपल्या जबरदस्त खेळीने जगाला वेड लावणारा धोनी आता मनोरंजन क्षेत्रावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. धोनीची प्रोडक्शन कंपनी ‘लेट्स गेट मॅरिड’ हा टॉलिवूड चित्रपट सध्या बनवत आहे. धोनीने पहिल्या चित्रपट निर्मितीसाठी बॉलिवूड न निवडता टॉलिवूडला प्राधान्य दिले आहे. तसेच चित्रपटाच्या टायटलचे मोशन पिक्चर ट्विटरवर शेअर केले आहे.