देशात एकीकडे कोरोना व्हायरसची दहशत असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाल्यांनो, आपल्या चिमुकल्यांना सांभाळन्याची वेळ आली आहे. कारण, चिमुकल्यांमध्ये RSV, H3N2, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास, खोकला हे या आजाराची लक्षणे आहेत. या व्हायरसमुळे औरंगाबादमधील बाल रुग्णालये फुल्ल झाली आहेत. या व्हायरसची लक्षणे जाणवल्यास अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवा, असं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे. हा विषाणूजन्य व्हायरस प्रामुख्याने हिवाळ्यात लहान मुलांमध्ये आढळत आहे.
काय आहे हा Adenoviruses?
– अॅडिनोव्हायरस हा एक विषाणू आहे जो श्वासनलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्गाच्या अस्तरांवर वाढतो.
– या विषाणूमुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि लघवी संसर्ग होऊ शकतो.
– या विषाणूचे खूप प्रकार आहेत परंतु या उद्रेकामागे एडेनोव्हायरस 7 असल्याचे म्हटले जाते.
– अॅडिनोव्हायरस 7 विशेषतः धोकादायक आहे आणि त्यामुळे न्यूमोनियासह मोठ्या श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
– अॅडिनोव्हायरसमुळे मृत्यू होत नाही. मात्र ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांना याचा धोका जास्त असतो.