भारताच्या युवा महिला संघाने अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. भारतीय महिला अंडर-19 संघ आता वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. आज (ता. 27 जानेवारी) न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सेमिफायनलमध्ये भारतीय महिला संघाने सहज विजय मिळवला.
सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना अक्षरश: लोळवलं आणि न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 9 बाद 107 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
प्रत्युत्तरात भारताने फक्त 14.2 षटकांत 2 गडी गमावून 108 धावांचे माफक लक्ष्य गाठले आणि सामना 8 विकेट्स व 36 चेंडू राखून जिंकला. भारतीय संघाच्या श्वेता शेरावतने 45 चेंडूमध्ये 61 धावा केल्या आणि यावेळी तिने एकूण 10 चौकार मारले. सौम्या तिवारीने 26 चेंडूत 23 धावा केल्या. गोलंदाज पार्श्वी चोप्राने 4 षटकात केवळ 20 धावा देत 3 बळी घेतले.
या विजयासह महिला टी-20 वर्ल्ड कपचा हा पहिला सेमीफायनल सामना भारताने जिंकून फायनलमध्ये धडक मारली आहे. आता फायनलमध्ये भारताची लढत या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भिडणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मधील विजेत्याशी होणार आहे तर अंतिम सामना रविवारी 29 जानेवारी रोजी होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in\