SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पैसे जास्त खर्च करण्याची सवय आहे, मग ‘या’ टिप्स करा फॉलो..

आपण पैसे वाचवण्याचा नेहमी विचार करतो, पण तसं कधीतरीच होतं. अनेकदा मार्केटमध्ये गेल्यास अनावश्यक गोष्टींसाठी आपण हजारो रुपये खर्च करत असतो. जर आपल्याला पैसे वाचवायचे असतील, तर काही बेस्ट टिप्स वापरल्या गेल्या तर पैशांची चांगली बचत होऊ शकते.

1️⃣ दररोज 10 ते 100 रुपये बचत:

Advertisement

तुम्हाला पैसे खर्च करायची सवय असेल तर तुम्ही सेव्हिंगसाठी 10 ते 100 रुपयांपर्यंत पैसे गल्ल्यामध्ये टाकत जा. इमर्जन्सी फंड म्हणून तुम्हाला ते कामी येतील. यामुळे तुम्ही जास्त सेव्हिंग करु शकता.

2️⃣ रिवॉर्ड पॉईंट क्लेम करा:

Advertisement

शॉपिंग स्टोअर आणि वेबसाईट लक्जरी प्रोडक्टच्या खरेदीवर रिवॉर्ड पॉईंट ऑफर करते. हे रिवॉर्ड पॉईंट क्लेम करणे विसरु नका. शॉपिंग करण्यापूर्वी आपले रिवॉर्ड पॉईंट घेणे विसरु नका. रिवॉर्ड पॉईंट्सचा फायदा उचला.

3️⃣ फिटनेस:

Advertisement

जिममध्ये मेंबरशिप घेऊन त्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा घरात एक्झरसाइज करा किंवा पायी फिरायला जा. जिममध्ये एक महिना फिटनेस एक्झरसाइज शिका आणि नंतर ते घरीच करा, म्हणजे भरपूर पैसे वाचतील.

4️⃣ तुमची शॉपिंग लिस्ट तयार करा:

Advertisement

शॉपिंग करायला जर आवडत असेल तर महिन्यातून एकदाच लिस्ट तयार करा. एक्सपर्टनुसार ज्या वेळी लोक क्रेडिट आणि गिफ्ट सर्टिफिकेटसह शॉपिंग करतात तेव्हा ते लक्झरी आयटम विचार न करता खरेदी करतात. मात्र क्रेडिट कार्डने पेमेंट न करण्याचा प्रयत्न करा म्हणजे क्रेडिट कार्डने शॉपिंग करण्याची सवय मोडेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement