SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विद्यार्थी बनणार अधिक स्मार्ट, बाजारात आलं आहे ‘हे’ खास प्रोडक्ट..

सध्याच्या डिजिटल युगात सर्वकाही डिजिटल होत असताना आता अभ्यासापासून नोकरीपर्यंत सर्वत्र तंत्रज्ञानाची भर असते. आपण किंवा आपली मुले, भाऊ, बहीण वही, पेन आणि पाटी पेन्सिलने अभ्यास करत असतील, तर आधुनिक तंत्रज्ञान त्यांना बदलायला भाग पाडत आहे.

अनेक इन्स्टिट्यूट आता टॅबलेट आणि पीसीवर व्हिडीओ कॉलिंग द्वारे, ऍप्सद्वारे क्लास घेत असतात. त्यामुळे आता पाटी पेन्सिल बहुदा वापरावी लागत नाही. आता काही स्मार्ट रायटिंग पॅड्स बाजारात आले आहेत. जे तुम्हाला स्मार्ट बनायला फार उपयोगी पडू शकतात.

Advertisement

एलसीडी ड्रॉईंग टॅबलेटमध्ये अनेक स्तरांवर प्रतिरोधक स्क्रीन असते ती प्रेशरमुळे स्पर्श ओळखते. याचा एक लेयर हा लिक्विड क्रिस्टलचा तयार करण्यात आलेला आहे. स्क्रीनच्या इलेक्ट्रोडमध्ये असणारी गॅप कमी करतात. त्यामुळे स्क्रीनवर जे काढले जाते ते पॅडवर दिसते. हे तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येतील.

आताच्या काळात स्मार्ट पॅड्स हे अत्यंत स्वस्त आहेत की खरेदी केल्यावर आपले बरेच पैसे वाचतात. या स्मार्ट पॅड्सचे वजन फक्त 150 ग्रॅम इतके असते. ते पोर्टेबल प्रकारातले असते. त्यामुळे ते शाळेच्या दप्तरामध्ये आणि हॅन्डबॅगमध्ये ठेवता येते. आपल्या वहीपेक्षा स्लिम असतात. यामुळे आपला कागदपत्रे, पेन्सिल आणि खोडरबरवर अधिक खर्च होत नाही. बहुतेक स्मार्टपॅड्स हे अजिबात प्रकाश सोडत नाहीत. Amazon च्या लोकप्रिय ई-रीडर Kindle प्रमाणेच ते काम करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement