आयसीसीनं एकदिवसीय क्रमवारी नुकतीच जारी केली आहे . यामध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या शुभमन गिलला 20 गुणांचा फायदा झाला असून त्याने सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर विराट कोहली एक स्थानाने घसरून सातव्या स्थानावर आला आहे. याशिवाय टीम इंडिया एकदिवसीय रँकिंगमध्ये पहिल्या नंबरवर पोहोचली आहे. मोहम्मद सिराज आयसीसी नंबर 1 ODI बॉलर ठरला आहे.
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीच्या टॉप-10 फलंदाजामध्ये तीन भारतीय फलंदाज आहेत. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत टॉप-10 फलंदाजामध्ये रोहित शर्मादेखील 10व्या क्रमांकावर असताना न्यूझीलंडविरोधात अखेरच्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी केल्याने तो आता 9व्या क्रमांकावर आला आहे. तर टी-20 फॉरमॅटमध्ये आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर 2022 तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव ठरला आहे.
एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबार आझम असून रासी वान डेर डूसन (766) दुसऱ्या तर क्विंटन डिकॉक (759) तिसऱ्या क्रमांकावर आहे. डेविड वॉर्नर आणि इमाम उल हक चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. शुभमन गिल सहाव्या तर विराट कोहली सातव्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथ आठव्या तर जॉनी बेअरस्टो 210 व्य कर्मणकावर आहे. आयसीसीने ODI टीम ऑफ द इयर-2022 जाहीर केली आहे. यामध्ये श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळाली आहे.
आयसीसी ODI टीम ऑफ द इयर-2022: बाबर आझम, ट्रेव्हीस हेड, शाय होप, श्रेयस अय्यर, टॉम लॅथम, सिकंदर रझा, मेहिदी हसन मिराज, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, ट्रेंट बोल्ट, ऍडम झॅम्पा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in