SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मार्केट अपडेट: सोन्याच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ, तर शेअर बाजारात तेजी..

देशात सोने-चांदी गुंतवणूक म्हणून खरेदी करण्याकडे ग्राहकांचा जास्त कल असतो. तसेच दुसरीकडे शेअर बाजार देखील गुंतवणूक म्हणून लोकांना पैसा कमावून देणारा मार्ग असतो. चला जाणून घेऊ सोने चांदीच्या दराबद्दल आणि शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रातील व्यवहाराबद्दल..

राज्यात आज (24 जाने.) 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 350 रुपयांनी वाढून 52700 रुपये झाले आहेत तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर आज 380 रुपयांनी वाढून 57380 रुपये झाले आहेत. तर 1 किलो चांदीचे दर 200 रुपयांनी वाढून 72500 पोहोचले आहेत. सध्या वाढत असलेल्या सोन्याच्या दरामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढत आहे.

Advertisement

आज भारतीय शेअर बाजारामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. आज सकाळी 11.15 वाजता सेन्सेक्स 143 अंकांनी वाढून 61,084.98 वर तर निफ्टी 27 अंकांनी वाढून 18,146.15 वर व्यवहार करताना दिसले.

कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?

Advertisement

टायटन, मारुती, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एशियन पेंट, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स

कोणते शेअर्स घसरले?

Advertisement

रिलायन्स, सन फार्मा, भारती एअरटेल, एसबीआय, एल अँड टी, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवरग्रिड, विप्रो, कोटक बँक, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, नेस्ले इंडिया

शेअर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच गुंतवणूक करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement