भारत विरुद्ध न्यूझीलंड आज तिसरा वनडे सामना आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंड विजयाचे खाते उघडते की भारत आजचाही सामना जिंकतो याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरच्या हाेळकर स्टेडियमवर आज तिसरा आणि मालिकेतील अखेरचा वनडे सामना हाेणार आहे.
भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यांत सरशी साधत मालिकेत विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारताला संघात प्रयोग करण्याची संधी आहे. रजत पाटीदार, शाहबाज अहमद, ईशान किशन, उमरान मलिकला या सामन्यात संधी मिळू शकते.
सामना कुठे पाहता येणार..
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणारा हा सामना आज (24 जाने.) दुपारी 1.30 वाजेपासून पाहता येणार आहे. सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्कवरील विविध वाहिन्यांवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी प्लस हॉटस्टार वर होईल.
भारताचा संभाव्य एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक
न्यूझीलंडचा संभाव्य एकदिवसीय संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in