SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: दिल्ली-एनसीआरसह 5 राज्यांमध्ये भूकंप!

देशाची राजधानी दिल्ली सह काही राज्यांत भूकंपाचे धक्के आज दुपारनंतर जाणवले आहेत. आज दुपारी 2.28 वा. NCRमध्ये 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होऊन अंदाजे 30 सेकंद जोरदार झटके बसले. मिळालेल्या माहीतीनुसार, दिल्लीतील भूकंपाचे केंद्र नेपाळच्या कालिकाहून 12 किमी अंतरावर होते.

⛰️ दिल्ली-एनसीआरसह उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश व हरियाणाच्या काही भागात हे धक्के जाणवले. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत व चीनपर्यंत जाणवल्याचे सांगितले जातेय. उत्तराखंडच्या डोंगराळ भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. नवीन वर्षात दिल्ली आणि परिसरात भूकंप होण्याची ही तिसरी वेळ आहे.

Advertisement

👉 दरम्यान यापूर्वी 5 जानेवारीला सायंकाळी 7.56 मिनिटांनी दिल्ली-एनसीआर व काश्मीरमध्ये भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.9 नोंदवण्यात आली. त्याचे केंद्र अफगाणिस्तानच्या फैजाबादहून 79 किमी दूर हिंदूकुश पर्वत रांगांत होते.

👉 याशिवाय नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी रात्रीही दिल्लीत भूकंप झाला होता. राष्ट्रीय भूकंप मापन विज्ञान केंद्राने सांगितले की, 1 जानेवारी रोजी मध्यरात्री 1.19 च्या सुमारास 3.8 तीव्रतेचा भूकंप आला. त्याचे केंद्र हरियाणाच्या झज्जरमध्ये होते. त्याची खोली जमिनीखाली 5 किमी आत होती. पण सुदैवाने त्यात कोणत्याही प्रकारची हाणी झाली नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement