SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आज रात्री 8 वाजल्यापासून बंद होणार Vodafone-Idea ची सेवा

देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी दिली आहे. कंपनी आधीच मोठ्या कर्जाखाली दबली आहे. परवाना शुल्क भरण्यात कंपनी अपयशी ठरली आहे. परवाना शुल्क सरकारला भरता न आल्याने कंपनीला परवाना रद्द करण्याची अडचण निर्माण झाली आहे. कंपनीला परवाना शुल्क म्हणून 780 कोटी रुपये भरायचे होते पण व्होडाफोन-आयडिया केवळ 78 कोटी रुपये देऊ शकली आहे. अशातच आता कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. आज (22 जानेवारी) रात्री 8 वाजल्यापासून Vodafone-Idea ची सेवा बंद राहणार आहे. वास्तविक, कंपनीने आपल्या ग्राहकांना संदेश पाठवून अलर्ट केलं आहे.

 

Advertisement

 

कंपनीच्या संदेशात असे म्हटले आहे की, प्रीपेड रिचार्ज सुविधा 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून बंद होणार आहे. ही सेवा 13 तास बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी 23 जानेवारी रोजी सकाळी 9.30 नंतर सुरू होणार आहे. कंपनीने हा संदेश आपल्या सर्व प्रीपेड वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये पाठवला आहे. वास्तविक, या काळात कोणत्याही ग्राहकाला कोणतीही अडचण येऊ नये, अशी कंपनीची इच्छा आहे, त्यामुळे आधीच अलर्ट करण्यात आले आहे.

Advertisement

 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement