हवामान विभागाने वर्तवला राज्यात पावसाचा अंदाज
हवामान विभागाने 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आला. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करुन दिली आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच अबू आझमी यांच्या पीएला या अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ देखील केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील संस्थेसाठी राज्य सरकारच्या पायघडय़ा
कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या दिल्लीतील ‘नॅकोफ इंडिया लि.’ या संस्थेला वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पायघडय़ा घातल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्राचा फारसा अनुभव पाठीशी नसलेल्या या संस्थेला राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांद्वारे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकाने थाटण्याची थेट परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 100 पाऊंडचा दंड
ब्रिटनचे पंतप्रधान भारतीय वंशाचे ऋषी सुतक यांना सीटबेल्ट न लावणं महागात पडलं आहे. त्यांना स्थानिक पोलिसांनी 100 पाउंडचा दंड ठोठावला आहे. ऋषी सुनक यांनी आपली चूक मान्य केली आहे. तसेच, सुनक यांनी आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली आहे.
भारताची एकदिवसीय सामन्यात विजयी आघाडी
टीम इंडियाने न्यूझीलंडवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 109 धावांचं आव्हान टीम इंडियाने 2 विकेट्स च्या मोबदल्यात 20.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.