महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023’ मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू होत आहे.
📝 विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत फक्त एकाच अर्जाद्वारे उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. उमेदवारांनी 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा. या पदभरतीसाठी 30 एप्रिल 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.
✔️ बदल: जाहिरातीमधील परिच्छेद क्रमांक 7.4 मध्ये सहायक कक्ष अधिकारी पदाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू असल्याचे अनावधानाने नमूद झाले आहे. सदर संवर्गासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी लागू नाही, असे आयोगाने ट्विट करून सांगितले आहे.
📄 संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3whK5Td
◆ सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी- 70 पदे
◆ महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी – 8 पदे
◆ वित्त विभाग राज्य कर निरीक्षक – 159 पदे
◆ गृह विभाग – पोलीस उपनिरीक्षक – 374 पदे
◆ महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक (श्रेणी – 1) / मुद्रांक निरीक्षक – 49 पदे
◆ गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – 6 पदे
◆ वित्त विभाग – तांत्रिक सहायक – 1 पद
◆ वित्त विभाग – कर सहायक – 468 पदे
◆ मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – 7034 पदे
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in