SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतात ‘ही’ जबरदस्त ‘ई-बाईक’ लॉंच, वाचा हटके फीचर्स..

भारतात नुकतीच प्रिमीयम आणि इकॉनॉमिकल ई-बाईक बनविणाऱ्या EMotorad कंपनीने एक ई-बाईक लॉंच केली आहे. ई- बाईकमध्ये loT आणि नवीन फीचर्स दिलेले असून ही मेड इन इंडिया बाईक आहे. या सिरीजमध्ये Nighthawk, Desert Eagle आणि Xplorer+ यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, EMotorad e-bikes ची एलिट ही सिरीज भारतात लाँच करण्यात आलेली सर्वात महागडी ई-बाईक’ आहे. एक्स फॅक्टर आणि प्रीमियम रेंजमध्ये या बाईक उपलब्ध आहेत. या ई-बाईकमध्ये योग्य अ‍ॅक्च्युएशन टेक्नॉलॉजी असून यामुळे स्लोप व शिफ्टिंग व्हेरिएशन होत नाही.

Advertisement

वाचा दमदार फीचर्स..

◆ ई-बाईकमध्ये मजबूत अशी अ‍ॅल्युमिनियम फ्रेम, रियर ब्रेक, टेक्ट्रो 2 पिस्टन फ्रंट, मॅक्सिस मिनियन डीएचएफ एक्सो प्रोटेक्शन ट्यूबलेस टायर तसेच 150 मिमीचे ट्रॅव्हल फोर्क आणि एसआरएएम शिफ्टिंग या प्रकारचे फीचर्स येतील. डेझर्ट ईगल मध्ये 120 मिमी ट्रॅव्हल फोर्कने सुसज्ज आहे. यामध्ये स्पीड कंट्रोल करण्यासाठी प्रोव्हन मोशन कंट्रोल हे फिचर असून यामध्ये Kenda Juggernaut टायर येतात.

Advertisement

◆ ई-बाइकच्या एक्स-फॅक्टर या रेंजमध्ये डिटेचेबल बॅटरी , एलसीडी, स्टील फ्रेम्स व डिस्क ब्रेक येतात. यामध्ये X1 ला 12 मॅग्नेटसह 1 लेव्हल पेडलचा सपोर्ट मिळतो. यामध्ये अजून काही फीचर्स येतात. जसे की, हार्ट रेट मोजणे, किलोमीटर, नेव्हिगेशनसाठी जीपीएस तसेच जिओ ट्रॅकिंगच्या फीचरचा वापर वापरकर्ते करू शकतात.

किंमत किती?

Advertisement

EMotorad कंपनीने अधिकृतरीत्या भारतात प्रिमीयम आणि इकॉनॉमिकल ई-बाईकचे लाँचिंग केले आहे. कंपनीने या बाईकच्या किंमती देखील जाहीर केल्या आहेत. एक्स फॅक्टर असलेल्या बाईकची किंमत ही 24,999 रुपये आहे तर, प्रीमियम रेंजमधील बाईकची किंमत ही 4 लाख 75000 रुपये आहे. ही ई-बाईक ग्राहकांना E Motorad च्या अधिकृत वेबसाईटवरून आणि लवकरच ऑफलाईन डीलरशिपवरून खरेदी करता येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement