SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धमाकेदार रिचार्ज प्लॅन्स लॉंच, ‘या’ कंपनीची ग्राहकांना मोठी भेट..

रिलायन्स जिओने आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लॅन्स लॉन्च केले आहेत. नव्या Jio प्लॅन्सबद्दल खास गोष्ट म्हणजे ग्राहकांना प्रति दिवस 2.5 जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. दोन्ही प्लॅन्समध्ये नियमित डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत.

रिलायन्स जिओचा 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Advertisement

रिलायन्स जिओचा 349 रुपयांच्या प्लॅनचा रिचार्ज केला की अमर्यादित कॉलसहित दिवसाला 2.5 GB हाय-स्पीड डेटा वापरता येऊ शकतो. या प्लॅनची वैधता 30 दिवस आहे. म्हणजेच महिन्याभरात ग्राहकाला प्लॅनद्वारे एकूण 75 GB डेटा ऑफर केला जाईल. याशिवाय 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस दिले जातील. युजर्सना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वापरण्याची परवानगी मिळेल. या ऑफरसह जिओ वेलकम ऑफर म्हणून 5G डेटा देखील ऑफर करणार आहे

रिलायन्स जिओचा 899 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Advertisement

रिलायन्स जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2.5 GB हाय-स्पीड डेटा आणि दररोज 100 एसएमएस अशी सुविधा मिळेल. हा प्लॅन 90 दिवसांपर्यंत वैध असणार आहे. ज्यामध्ये एकूण 225 GB डेटा ऑफर केला जाईल. तसेच JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चा सुद्धा लाभ घेता येणार आहे. तर वेलकम ऑफरचा एक भाग म्हणून 5G डेटा देखील ऑफर करण्यात येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement