SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट – दुपारच्या महत्वाच्या बातम्या..

😳 ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल

राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असणारी घडामोड म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक. आता अशी माहीती मिळत आहे की, ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील या अचानक नॉट रिचेबल झाल्या आहेत, यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महत्वाचं म्हणजे आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच देवेंद्र फडणवीसांनी गेम फिरवला अशी चर्चाही सुरु आहे.

Advertisement

🤑 शेअर मार्केट अपडेट:

आज (ता. 16 जाने.) शेअर बाजार खुला होताच सकाळी सेन्सेक्स 289 अंकानी उसळी घेत 60550 वर उघडला, तसेच निफ्टी 82 अंकानी वाढून 18033 वर उघडल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आता दुपारी 2.15 वाजता सेन्सेक्स 214 अंकांच्या घसरणीसह 60,046.26 वर तर निफ्टी 76 अंकांच्या घसरणीसह 17,880.55 व्यवहार करत आहे.

Advertisement

👥 भाजपची आज बैठक, रणनीती ठरणार..

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि त्याआधी 10 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक दिल्ली येथे पार पडणार आहे. या बैठकीत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर स्वतंत्र चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीत 35 केंद्रीय मंत्री, 12 राज्याचे मुख्यमंत्री, 37 राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

🎬 ‘वेड’ चित्रपट कलेक्शन:

‘वेड’च्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने शुक्रवारी 1.35 कोटींची, तर शनिवारी 2.72 कोटींची कमाई केली आणि रविवारी ‘वेड’ने 2.74 कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 47.66 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट 50 कोटींचा आकडा पार करणार असून आठवड्यातील शनिवार आणि रविवार हे दोन दिवस कमाईचे आकडे वाढवणारे असल्याचे दिसले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement