भारतात प्रथमच बासमती तांदळाच्या दर्जाबाबत विशेष नियम करण्यात आले आहेत. देशातील अनेक व्यापारी आणि तांदूळ कंपन्या बासमती तांदूळ चुकीच्या मार्गाने विकत पैसे कमावत असतात. आता FSSAI ने बासमती तांदळासाठी सर्वसमावेशक नियामक मानके अधिसूचित केले आहेत.
🔰 FSSAI च्या नवीन नियामक मानकामुळे बनावट बासमतीला आळा घालण्यातही मदत होणार आहे. बासमती तांदूळ चुकीच्या मार्गाने विकण्यावर लगाम बसणार असून FSSAI ने तयार केलेले नियम आता तांदूळ कंपन्यांना पाळावे लागतील. हे नियम येत्या 1 ऑगस्ट 2023 पासून भारतात लागू होणार आहेत.
👉 भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने ठरवलेल्या नियामक मानकांनुसार, वास्तविक बासमती तांदळामध्ये नैसर्गिक सुगंध असावा तसेच हा तांदुळ कृत्रिम रंग, कृत्रिम पॉलिश आणि कृत्रिम सुगंधांपासून मुक्त असावा असे सांगण्यात आले आहे.
📍 भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने तयार केलेले नियामक मानक 1 ऑगस्ट 2023 पासून लागू होतील. या नियमांचा मुख्य उद्देश बासमती तांदळातील भेसळ रोखणे आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हा आहे. दरम्यान 2022-23 मध्ये भारतातून 1.6 दशलक्ष टन तांदूळ निर्यात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in