SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🌏 नासाने शोधला नवीन ग्रह, हुबेहूब पृथ्वीच..!

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने सौरमालेच्या बाहेर पृथ्वीच्या आकाराचा एक ग्रह शोधला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 41 प्रकाशवर्ष म्हणजेच 15,00,000 किमी अंतरावर आहे. यासोबतच तो ग्रह 99 टक्के पृथ्वीसारखा दिसत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने यापूर्वी आठ व दहा अब्ज वर्षांपूर्वीच्या दोन आकाशगंगा शोधल्या आहेत. या टेलिस्‍कोपने शोधलेल्या या ‘आरएस13’ आणि ‘आरएस14’ अशा दोन आकाशगंगा आहेत.

नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने हा ग्रह शोधला असून आपल्या आकाशगंगेच्या बाहेर हा ग्रह आहे. LHS 475 b असे या ग्रहाला नाव देण्यात आले आहे. या ग्रहाच्या शोधामुळे खगोल शास्त्रज्ञांना पुढील संशोधनासाठी मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Advertisement

या ग्रहावर खास काय..?

  • पृथ्वीसारख्या नव्याने सापडलेल्या या ग्रहावर वातावरण असू शकते पण ते पृथ्वीप्रमाणे असण्याची तसेच शनीच्या टायटन या उपग्रहाप्रमाणे मिथेनचे वातावरण असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी नाकारली आहे.
  •  महत्त्वाचं म्हणजे या नवीन ग्रहावर 2 दिवसाचे वर्ष आहे, म्हणजेच हा ग्रह त्याच्या सूर्याभोवती 2 दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. मुळात हा ग्रह त्याच्या सूर्याच्या अतिशय जवळ असूनही त्यावर वातावरण अस्तित्वात असावे, असा संशोधकांनी अंदाज बांधला आहे.

 

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement