भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू असून गुवाहाटीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेत भारताने 67 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता आज दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे, वाचा सामन्याचे अपडेट्स..
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना भारताने जिकल्यांनंतर आज (12 जाने.) दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात श्रीलंकेला भारताने अवघ्या 215 धावांवर ऑल आउट केलं आहे. यामध्ये केवळ एकाच फलंदाजाला अर्धशतक करता आले आहे.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना आपल्या विकेट्स काही धावांतच गमावल्या. भारताकडून सुरेख गोलंदाजीचे प्रदर्शन करताना कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर उमरान मलिकने 2 विकेट्स घेतल्या. यासोबतच अक्षर पटेलने 1 विकेट घेतली आहे.
श्रीलंकेडून एन. फर्नांडोने 63 चेंडूत 50 धावा करून सर्वाधिक योगदान दिले. तर कुसल मेंडिसने 34 चेंडूत 34 धावा तर दुनिथने 34 चेंडूत 32 धावा करून संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. यांसह श्रीलंकेने भारताला 216 धावांचे विजयासाठी लक्ष्य ठेवले आहे. आजच्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसून आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in