SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🏏 पृथ्वी शॉचे तुफानी त्रिशतक, रहाणेही चमकला!

रणजी ट्रॉफीमध्ये आसाम आणि मुंबई यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात मुंबईच्या पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे च्या शानदार खेळीमुळे मुंबईने 687 धावांपर्यंत मजल मारली आहे. यामुळे या सामन्यात मुंबईचे पारडे जड झाले आहे. तर पृथ्वी शॉने त्रिशतक झळकावल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पृथ्वी शॉने त्याच्या त्रिशतकी खेळीत 383 चेंडूत 379 धावांची खेळी केली. यात त्याने 49 चौकार आणि 4 षटकार खेचले. त्याला अजिंक्य रहाणे देखील त्याला साथ देत उत्कृष्ट खेळी करत मुंबईला मोठी धावसंख्या उभारून दिली. सध्या रणजी ट्रॉफीमध्ये सुरू असललेल्या या आसाम विरुद्ध मुंबई सामन्यात मराठमोठ्या अजिंक्य रहाणेनेदेखील शानदार शतक झळकावले आहे. त्याने 302 चेंडूत 191 धावा करून मोलाचे योगदान दिले. याशिवाय इतर कुणालाही खास कामगिरी करता आलेली नाही.

Advertisement

दरम्यान एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियात पृथ्वी शॉला संधीही देण्यात आली होती. त्याचे प्रदर्शनही चांगले राहिले आहे. आता पुन्हा त्याचा रणजी ट्रॉफीमध्ये खेळ पाहून त्याला टीम इंडियात स्थान मिळणार का असे चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement