SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: विराट कोहलीचे दमदार शतक, भारत 300 पार..

आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार सुरुवातीनंतर विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आहे. यामुळे कोहलीच्या फॉर्मबाबत आता चिंता नसल्याचं दिसत आहे. कोहलीच्या आकर्षक खेळीमुळे भारताच्या एकूण 373 धावा झाल्या आहेत.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने भारताची प्रथम फलंदाजी सुरु झाली असता सुरुवातीपासून शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं त्यानंतर रोहित शर्मा 83 तर शुभमन गिल 70 धावांवर बाद झाले. यानंतर श्रेयस अय्यर 28, के. एल. राहुल 39, हार्दिक पंड्या 14, अक्षर पटेल 9 धावांवर बाद झाले.

Advertisement

यादरम्यान विराट कोहलीने तुफान फलंदाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढले आणि अखेरपर्यंत धावा बनविल्या. कोहलीने 87 चेंडूत 113 धावा केल्या. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारले आहेत. यानंतर मोहम्मद शमी 4 तर मोहम्मद सिराज 7 धावांवर नाबाद राहिले. अशा रीतीने भारतीय संघाने एकूण 373/7 धावा केल्या आहेत.

श्रीलंकेने पहिल्या वनडेमध्ये चांगली गोलंदाजी करण्याचे प्रयत्न केले. भारतीय फलंदाजी कमकुवत होण्यामागे काही खास श्रीलंकेच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी ठरली. यामध्ये के. रजिथाने 3 विकेट्स, मधूशंकाने 1, करुणारत्नेने 1, शनाकाने 1, डि. सिल्व्हाने 1 विकेट्स घेतल्या. अशा एकूण 7 विकेट्स भारतीय संघाने गमावल्या. आता श्रीलंकेची फलंदाजी सुरू झाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement