देशातील अनेक भागांमध्ये थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात आता तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त होत आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसात तापमानात घट दिसू शकते.
देशात पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. तर मंगळवारी (10 जानेवारी) थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र देशात बऱ्याच राज्यात थंडीची लाट आली आहे.
महाराष्ट्रात थंडी वाढणार..
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा व मराठवाड्याचा काही भाग तसेच विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढली असून आणखी थंडी वाढू शकते, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in