SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बाजारात ‘बकेट गिझर’ ची क्रेझ, मिळतंय फक्त ‘एवढ्या’ रुपयांना..

जर तुम्ही 10 ते 15 लिटरचा गिझर विकत घेतला तर तुम्हाला त्यासाठी कमीत कमी 4-5 हजार रुपयांच्या जवळपास पैसे खर्च करावे लागू शकतात. एवढी मोठी रक्कम खर्च करायची म्हणजे आपण थोडासा विचार करतोच, पण जर तुम्ही कमी पैशांत मिळणारे गिझर घेतले तर ते देखील तुम्हाला तितकाच फायदा देऊ शकतं.

जर तुमचं बजेट कमी असेल तर बाजारात असा एक गिझर मिळत आहे ज्याला ‘बकेट गिझर’ (Bucket Geyser) म्हटलं जातं. नावारून आपल्याला अंदाज आलाच असेल. या गिझरचा सध्या बाजारात खूप ट्रेंड आहे. सर्वसामान्यांना परवडणारे आहे, याशिवाय तुम्ही ते कुठेही घेऊन जाऊ शकता कारण ते खूप हलके आहे. चला तर जाणून घेऊया या गिझरबाबत आणखी माहीती..

Advertisement

बाजारातील हा ‘बकेट गीझर’ मिळतो, ज्यामुले तुम्हाला बादलीत पाणी गरम करता येते. ज्यामध्ये सुमारे एकाच वेळी सुमारे 20 ते 25 लिटर पाणी गरम करता येईल. सामान्य गीझरच्या तुलनेत यात पाणी गरम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी वेळ लागेल. यासाठी जास्त काही त्रास घेण्याची गरज नाही. यासोबतच तुम्ही ते पोर्टेबल असल्यामुळे कुठेही घेऊन जाऊ शकता.

तसेच, या बादलीच्या आत पाणी गरम करण्यासाठी एक हीटर आहे, जे काही मिनिटांत पाणी गरम करते आणि तुम्हाला हिवाळ्यातही काही वेळातच गरम पाणी उपलब्ध करून देते. बाजारात वेगवेगळ्या किंमती असल्या तरी हे तुम्हाला 1200 ते 2000 रुपयांच्या दरम्यान खरेदी करता येऊ शकतो. जे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही खरेदी करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement