SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दमदार इलेक्ट्रिक कार होणार लॉंच, रेंज 631 किमीपर्यंत..?

ह्युंदाई मोटार इंडिया आता आपली दमदार इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात आणणार आहे. ह्युंदाई कंपनी येत्या 11 जानेवारीला आपली शानदार इलेक्ट्रिक एसयूवी Ioniq 5 लॉन्च करणार आहे. ह्युंदाईची ही एसयूवी किया ईव्ही-6 ला नक्कीच टक्कर देणारी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कंपनी येत्या 11 जानेवारीला Ioniq 5 गाडीच्या किंमतीची ऑटो एक्स्पो 2023 मध्ये घोषणा करणार आहे. जर तुम्हाला ही एसयूव्ही खरेदी करायची असेल तर तुम्हाला ती डिलरशीप च्या साहाय्याने किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर 1 लाख रुपये टोकन रक्कम भरून बुक करता येणार आहे.

Advertisement

ह्युंदाई कंपनीने सांगितले की, ही एसयूव्ही एकदा चार्ज केली की 631 किलोमीटर अंतर पार करू शकते. गाडीच्या बाबत कंपनीने अद्याप काहीही खुलासा केलेला नाही. तरी कारमध्ये 12.3 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, बोसचे 8 स्पीकर साउंड सिस्टम, वायरलेस चार्जिंग, रेन सेंसिंग वायपर, 12.3 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, नेव्हिगेशन, ऑटो डिफॉगर, पॉवर टेल गेटसह अनेक शानदार फीचर्स मिळतील.

दरम्यान कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 72.6 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देईल जो 214 BHP पॉवर व 350 एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकतो. यातील बॅटरी चार्जिंग करण्यासाठी कंपनीने नियमित चार्जरसह फास्ट चार्जरचा सपोर्ट देऊन दावा केला आहे की, 350 kW DC चार्जरने चार्ज केल्यास बॅटरी अवघ्या 18 मिनिटात 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement