भारतीय संघाने पहिला टी-20 सामना जिंकल्यानंतर आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात शिवम मावीने घातक गोलंदाजी केल्याने सामन्यावर भारताची पकड आली आणि भारताने अवघ्या 2 धावांनी विजय मिळवला होता.
आता आज (ता. 5 जाने.) भारताचा दुसरा टी-20 सामना सुरु होणार असून आजच्या सामन्यात कोणाचा परफॉर्मन्स भारताला पुन्हा विजय मिळवून देऊ शकेल, हे समजणार आहे. यासोबतच श्रीलंकेचा संघ आता पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका सामना कुठे पाहता येणार?
भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका हा दुसरा टी-20 सामना आज 5 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी-20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच या सामन्याचं हॉटस्टार ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकणार आहे.
भारताचा संभाव्य टी-20 संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन (दुखापतग्रस्त), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in