SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट ते डब्ल्यूएचओ ने चीनला सुनावले..!

ऋषभ पंतला दिल्लीच्या रुग्णालयात नेलं जाणार?

क्रिकेटपटू ऋषभ पंतला कार अपघातात जखमी झाल्यानंतर उत्तराखंडच्या देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याच्या शरीरावर अजूनही सूज असून एमआरआय स्कॅन करण्यात अडचणी येत असल्याने त्याला दिल्लीच्या रुग्णालयात हलवण्याची दाट शक्यता आहे. याप्रसंगी एअर अँबुलन्सचा वापर केला जाऊ शकतो.

Advertisement

परदेशी प्रवाशांना उद्यापासून आरटीपीसीआर..

भारताने कोरोनाबाबत आता मोठा निर्णय घेत चीन, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, सिंगापूर व थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट बंधनकारक केली आहे. उद्यापासून (1 जानेवारी 2023) हे निर्बंध लागू होणार आहेत. या सर्व देशांमधून जे प्रवासी येतील त्यांना प्रवासापूर्वीच आपले रिपोर्ट एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावे लागतील, अशी माहीती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली.

Advertisement

रोनाल्डोचा 4,400 कोटी रुपयांचा करार..

फिफा मध्ये संघाला विजय मिळाला नसला तरी पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियाने रोनाल्डोने आता मोठी बाजी मारली आहे कारण तो अधिकृतपणे आता सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल-नसरचा भाग झाला. यासाठी त्याला तब्बल 4,400 कोटी रुपये देऊन करारबद्ध करण्यात आले आहे. रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली आहे. रोनाल्डोचा करार जून 2025 पर्यंत राहणार आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेचे चीनला आदेश..

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनमध्ये लाखो रुग्ण आढळत असताना चीनला कोरोनाची दररोजची आकडेवारी सादर करण्यासाठी आदेश दिले आहेत. चीनमध्ये BF.7 या नव्या प्रकारामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असूनही चीनने सर्व निर्बंधही हटवले होते आणि त्यांनी कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यास टाळाटाळ केली होती, म्हणून डब्ल्यूएचओ चीनला आदेश दिले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement