नववर्षाच्या प्रारंभी गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने एनएससी, पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवी, तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनांच्या व्याजदरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे व्याजदर येत्या 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहेत. अर्थ मंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
बचत योजनांच्या व्याजात वाढ
मोदी सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यात किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांसह एनएससी, ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांचा समावेश आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्च दरम्यान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली असली, तरी पीपीएफ व सुकन्या समृद्धी योजनाच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बचत योजनांच्या व्याजदरात केलेली वाढ पुढीलप्रमाणे
बचत योजना | तिसऱ्या तिमाहीमध्ये व्याज | चौथ्या तिमाहीमध्ये |
सेव्हिंग डिपॉजिट | 4.00% | 4.00% |
1 वर्षाचं डिपॉजिट | 5.50% | 6.60% |
2 वर्षाचं डिपॉजिट | 5.70% | 6.80% |
3 वर्षाचं डिपॉजिट | 5.80% | 6.90% |
5 वर्षाचं डिपॉजिट | 6.70% | 7.00% |
5 वर्षाचं रेकरिंग डिपॉजिट | 5.80% | 5.80% |
ज्येष्ठ नागरिकाच्या बचत योजना | 7.60% | 8.00% |
मासिक इनकम अकाउंट | 6.70% | 7.10% |
एनएससी | 6.80% | 7.00% |
पीपीएफ | 7.10% | 7.10% |
किसान विकास पत्र | 7.0% (123 महिने) | 7.2% (120 महिने) |
सुकन्या समृद्धी योजना | 7.60% | 7.60% |
जानेवारी ते एप्रिल या तिमाहीसाठी अर्थ मंत्रालयाने व्याजदर जाहीर केले आहेत. मात्र, त्यात पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनाच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, इतर छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे.