भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये गेल्या 15 वर्षांपासून एकही कसोटी सामना खेळला गेलेला नाही. ‘आयसीसी’च्या मोठ्या स्पर्धेतच हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात. मात्र, या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना आयोजित करण्यासाठी एक देश पुढे आला आहे.
टी-20 वर्ल्ड कपमधील भारत व पाकिस्तान सामन्याला प्रचंड मोठं यश मिळालं. त्यामुळे आता या दोन्ही संघात तटस्थ ठिकाणी कसाेटी सामना खेळवण्याचा तयारी चालली आहे.
या देशाने दाखवली तयारी
मेलबर्न क्रिकेट क्लब व व्हिक्टोरियन सरकारने भारत व पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याचे आयोजन करण्याची तयारी दाखवली असून, याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे अनौपचारिक चौकशी केल्याची माहिती एमसीसीचे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी दिली.
भारत-पाकिस्तानमधील कसोटी सामना ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यास नक्की आवडेल. अर्थात, दोन्ही देशांच्या सहमतीवर ते अवलंबून असेल. याबाबतचा अंतिम निर्णय ‘बीसीसीआय’ व ‘पीसीबी’ घेईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले.