भारत विरुद्ध श्रीलंकामध्ये येत्या 3 जानेवारीपासून 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारताचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. बीसीसीआय आता संघ निवडीकडे विशेष लक्ष देऊन युवा खेळाडूंना अधिक संधी देत आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी व वनडे मालिकेसाठी संभाव्य 16 खेळाडूंचा भारतीय संघ आता जाहीर केला गेला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईमध्ये, दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यामध्ये तर तिसरा आणि शेवटचा सामना 7 जानेवारीला राजकोट येथे खेळवला जाणार आहे.
टी-20:संभाव्य भारतीय संघ- हार्दिक पंड्या (C), सुर्यकुमार यादव (VC), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
⚾ भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका झाल्यानंतर लगेच 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात या मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारीला गुवाहाटी, 12 जानेवारीला कोलकाता, तर तिसरा वनडे सामना 15 जानेवारीला तिरुअनंतपुरम येथे होईल.
वनडे: संभाव्य भारतीय संघ- रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in