SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सेकंड हँड कार खरेदी करताय? ‘येथे’ सुरू आहेत भन्नाट ऑफर्स..

मारुती सुझुकी कंपनीच्या वेगवेगळ्या कार आपल्याला माहीत आहेत. जर आपल्याला नवीन कार घेणे परवडत नसेल तर आपण सेकंड हँड कार खरेदी करू शकतो. मारुती सुझुकी कंपनीच्या प्रसिद्ध कार्सपैकी कंपनीच्या काही कार्सदेखील शहरापासून खेड्यापर्यंत परिचित आहेत. जर तुम्हाला मारुतीच्या ठराविक सेकंड हँड कार्स विकत घ्यायच्या असतील आणि बजेट कमी असेल तर वाचा..

जुनी कार खरेदीचा विचार करत असाल तर मारुती सुझुकीच्या ‘ट्रू व्हॅल्यू’ वेबसाईटवर जाऊन काही कार्सचे मॉडेल्स विक्रीसाठी लिस्ट केले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्यापैकी काही खास मॉडेल्ससबद्दल म्हणजेच Maruti Wagon R VXI आणि Maruti Alto K10 VXI कारवर असणाऱ्या भन्नाट ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. जिथे तुम्ही फक्त 2 लाखात कार खरेदी करू शकता.

Advertisement

जाणून घेऊया ऑफर्सबद्दल..

★ वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनुसार, विजयवाडा येथे Maruti Wagon R VX 2018 चे मॉडेल विक्रीसाठी लिस्ट केले गेले असून कारसोबत 1 वर्ष वॉरंटी व 3 सेवा मोफत मिळतील. ती जवळपास 2 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कारने आतापर्यंत एकूण 33873 किमी अंतर गाठले आहे.

Advertisement

★ तसेच कैथलमध्ये 2016 चे मॉडेल Maruti Alto K10 VXI हे देखील 2 लाखात मिळेल. ही कार आतापर्यंत 99,235 किमी फिरली आहे. ही कार कैथलमध्ये रजिस्टर्ड आहे. कार खरेदीपूर्वी फक्त एकदा कागदपत्रे तपासून पाहा.

★ गुवाहाटी येथे Maruti Alto 800 LXI ही कार देखील वेबसाईटवर 2 लाखात उपलब्ध आहे. कार गुवाहाटी येथे नोंदणीकृत आहे. या कारने 2,52,207 किमी अंतर पार केले आहे.

Advertisement

★ राजकोट येथे 2016 चे मॉडेल Maruti Alto K10 VXI फक्त 2 लाखामध्ये उपलब्ध आहे. ही कार एकूण 1,43,338 किमी धावली आहे. यामुळे गाडीची कंडिशन पाहूनच खरेदी करावी. याशिवाय कंपनी गाडी पूर्णपणे तपासूनच विक्रीसाठी ठेवत असते, यामुळे फायदा होतो. तसेच वरील कार्सच्या किंमतीत कंपनी कधीही बदल करू शकते किंवा ऑफर्समध्ये कधीही बदल होऊ शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement