SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कचेरीची कामे मार्गी लावाल. ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल. दिवस भरपूर आनंद घेऊन येणारा आहे. आरोग्य चांगले राहील. नोकरीमध्ये प्रभाव पडेल. लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. पती-पत्नी सोबत राहिल्याने घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. सांधेदुखीच्या तक्रारी असू शकतात. कौटुंबिक वातावरणात सुख-शांती राहील. अशक्तपणा आणि सांधेदुखी होऊ शकते.

वृषभ (Taurus): काही खर्च अचानक सामोरे येतील. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. जवळचे मित्र भेटतील. हातातील कामातून आनंद मिळेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत फलकारक आणि भाग्य उजळविणारा आहे. यश तुमचे दार ठोठावणार आहे. घरातील कामात व्यस्त असाल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांवरही लक्ष केंद्रित करू शकाल. कौटुंबिक जीवन सामान्य होऊ शकते.

मिथुन (Gemini) : नवीन काम अंगावर येऊ शकते. विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस बर्‍यापैकी व्यस्त राहील. कामे उरकताना दमछाक होऊ शकते. आपली क्षमता लक्षात घ्यावी. मोठा आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यास करुन चांगलं प्रदर्शन करतील. प्रत्येक कार्य तुम्ही आत्मविश्वासाने कराल आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होईल. व्यवसायात नवीन पक्ष आणि नवीन लोकांशी व्यवहार करताना प्रत्येक टप्प्यावर चर्चा करा.

कर्क (Cancer) : महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात. दिवस संमिश्र राहील. हातातील काम यशस्वी होईल. बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा. कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे वातावरण असेल. वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. तुमचे सर्व कार्य चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. तुमच्या कर्मावर अधिक विश्वास ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विवाहयोग्य सदस्याशी चांगले संबंध राहिल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.


सिंह (Leo) : आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरगुती गैरसमज टाळावेत. नवी गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. प्रवासाचा प्लॅन आखाल. आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यात यश प्राप्त कराल. आज ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील. आळस सोडा आणि पूर्ण ऊर्जा आणि आत्मविश्वासाने स्वतःला तुमच्या कामात झोकून द्या. वेळ तुमचे नवीन यश निर्माण करत आहे. उत्पन्नाचे स्त्रोतही वाढतील.

कन्या (Virgo) : कामात सकारात्मक बदल संभवतात. नियोजनबद्ध कामे करा. एकाच वेळी अनेक कामे हाती घेऊ नका. मन स्थिर ठेऊन विचार करावा. चंचलतेवर मात करावी लागेल. घरात सुख-शांतीचं वातावरण असेल. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. वाद-विवाद शक्यतो टाळावे, बोलण्यावर ताबा ठेवा. तुम्हाला तुमची उर्जा एकत्र करण्याची आणि यशस्वी होण्यासाठी नवीन धोरणे आखण्याची गरज आहे. तसेच, आपण आपल्या मनोबलातून सकारात्मक परिणाम प्राप्त करू शकता.

तुळ (Libra) : मानसिक स्वास्थ्य जपावे. इतरांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. सहकारी वर्ग मदत करेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. सकारात्मक विचारांमुळे मनात आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल. दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. बाहेर फिरायला जाऊ शकता. चुकीच्या कामात वेळ वाया घालवू नका. तुमची कामाची नैतिकता बदलणे तुमच्या व्यवसायासाठी सकारात्मक असेल.

वृश्‍चिक (Scorpio) : मानसिक चुळबुळ कमी करावी. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्याबाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्य निरोगी राहील, दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. पती-पत्नी एकमेकांच्या सहकार्याने कौटुंबिक वातावरण शांत करू शकतील. तणाव आणि राग यांसारख्या परिस्थिती कधीतरी प्रबळ होऊ शकतात.

Advertisementधनु (Sagittarius) : घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. खर्च वाढेल, आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. तुम्ही तणावमुक्त आणि उत्साही असू शकता. कोणतेही काम शांतपणे विचार करून पूर्ण करा. कोणत्याही संकटात संयम गमावणे योग्य नाही. आपल्या धाडसाचे फळ मिळेल.

मकर (Capricorn) : एखादी नवीन संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते. गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. एखादा वाद संपुष्टात येईल. नवीन कामाची सुरूवात करू शकता. आरोग्य निरोगी राहील. सरकारी कामात लवकरच यश मिळेल. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही समस्येचा सामना करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तत्त्वांशी थोडी तडजोड करावी लागेल.

कुंभ (Aquarious) : अतिधाडस दाखवू नका. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. जुगार खेळतांना सावध राहावे. हातातील गोष्टी जपून ठेवा. जुनी कामे आधी मार्गी लावावीत. विद्यार्थी आपल्या करिअरमधील यशाने प्रसन्न होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल, पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. प्रमोशनची संधी आहे. गरजू आणि ज्येष्ठांची सेवा करण्यात आणि त्यांची काळजी घेण्यातही तुम्हाला विशेष रस असेल. आपल्या धाडसाचे फळ मिळेल.

मीन (Pisces) : अपेक्षित उत्तर हाती येईल. लहान प्रवास घडेल. कामात अनुकूलता येईल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल. आर्थिक स्थिती बिघडू शकते. शारिरीक कष्टामुळे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल. मोठा खर्च होऊ शकतो. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. त्यामुळे वातावरण नकारात्मक होईल. आज उत्पन्नाची स्थिती चांगली राहील. घरात आनंदाचे वातावरण असू शकते. गॅस आणि बद्धकोष्ठतेमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होऊ शकते.

Advertisement