नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना होणार आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, या सामन्यासाठी मोठे निर्बंध लागू शकतात.
भारत विरुद्ध श्रीलंकेत 3 जानेवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यासाठी पेटीएम इनसायडरवर तिकीटांची विक्री सुरु झाली आहे. मात्र, प्रेक्षकांसह खेळाडूंनाही काही नियमांचे पालन करावे लागू शकते.
कोणते निर्बंध असणार..?
- भारत व श्रीलंकेतील मालिकेत प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा नसली, तरी प्रेक्षकांसाठी मास्कसक्ती केली जाऊ शकते.
- तसेच, ज्येष्ठ व आजारी लोकांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
- प्रेक्षकांना खेळाडूंच्या जवळ जाता येणार नाही, तसेच खेळाडूंना बाहेरील व्यक्तींना भेटता येणार नाही.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, मुंबईत नव्याने गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आलं आहे.