SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वेबसिरीज पाहून बँकेतील सोने केले लंपास, चोरांनी लढवली ‘ही’ शक्कल..

स्पॅनिश क्राईम थ्रिलर वेबसिरीज मनी हाईस्टप्रमाणेच उत्तरप्रदेशमधील कानपुर येथे सोने चोरीला गेल्याचं नुकतंच समजलं आहे. ही चोरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत केल्याने सर्वत्र चर्चा पसरत आहे. चोरांनी अक्षरशः या वेबसिरीजच्या स्टोरीप्रमाणेच बँकेवर पाळत ठेवून वेळीच काम दाखवले.

कानपूरमध्ये सचेंडी येथील एसबीआय बँकेच्या शाखेच्या मागील बाजूस कोणतीही इमारत नसल्याने ही चोरी झाली. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असणारी ‘मनी हाईस्ट’ ही वेबसिरीज जगभरात प्रसिद्ध झाली. ज्यात चोरी करण्यापूर्वीची तयारी, चोरीचा प्लॅन करणारा मास्टरमाइंड अभिनेता दाखवला आहे. या बँकेतून सोनेकर्ज घेतलेल्या 29 जणांचे हे सोने चोरी गेले असल्याची माहीती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, “चोरांनी मोठ-मोठ्या चोऱ्या करण्यासाठी या वेबसिरीजप्रमाणे काही दिवस आधीच बँकेत चकरा मारून किंवा कोणाशी ओळख करून बँकेबद्दल माहीती मिळवली असावी. काही दिवसांपूर्वी चोरांनी प्लॅन करत दररोज बोगदा खोदत अखेर 21 डिसेंबरला सोने लुटले. त्यापूर्वी लॉकरबद्दलही अचूक माहीती मिळवत अंदाजे 15 दिवसांत बोगदा खोदला असावा. फरशी तोडून चोर आतमध्ये घुसले आणि लॉकर तोडून 2 किलो सोने चोरी केले असावे’, अशी माहीती दिली.

‘अशी’ झाली चोरी..

Advertisement

कानपूरमधील सचेंडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमागून चोरांनी खोदलेला बोगदा थेट बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये येतो. येथूनच चोरांनी ड्रिल मशिनने फरशी तोडून आत प्रवेश केला. तसेच स्ट्राँग रूमचे लॉकर गॅस कटरने कट करून सुमारे 2 किलो सोने चोरले. चोरट्यांनी इतक्या हुशारीने काम केले की त्यांनी बँकेचा अलार्मदेखील वाजू दिला नाही. गुरुवारी (ता. 22 डिसेंबर) सकाळी बँकेचे कर्मचारी जेव्हा कामावर आले, तेव्हा अनेकांना हे पाहून धक्काच बसला आणि हा प्रकार उघडकीस आला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement