SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग:’या’ मंदिरांत मास्कविना नो एंट्री, तर गर्दीच्या ठिकाणी जाताना…

भारत सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अलर्ट झाले आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात देखील काळजी म्हणून उपाययोजना राबविण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज (23 डिसेंबर) दुपारी 3 वाजता सर्व राज्यातील आरोग्य मंत्र्यांना कोरोना परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे.

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे (बीएफ.7) विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली करत काही नियम जारी केले आहेत. आता आंतरराष्ट्रीय विमानतळावर रँडम आरटीपीसीआर सँपलिंग सुरू केलं आहे.

Advertisement

राज्यात चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर दिला जाणार आहे. मास्कसक्ती नाही, परंतु वृद्ध आणि अतिजोखीम असणाऱ्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा (मास्क) वापर करण्याचं व सुरक्षित अंतर ठेवण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातही मास्कबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख मंदिरांत प्रवेश करताना..

Advertisement

⏩ राज्यातील प्रमुख मंदिरात संबंधित मंदिर समिती/संस्थान यांच्याकडूनच मंदिर परिसरात भाविकांना मास्क घालण्याचे आवाहन करणारे फलक लावले जात आहेत.
⏩ शिर्डीतील साईबाबा मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क परिधान करावा लागणार आहे.
⏩ पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी येताना भक्तांना मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे.
⏩ कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात फक्त कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती केली आहे.
⏩ मुंबईतील मुंबा देवी मंदिरातील कर्मचाऱ्यांना तसेच भाविकांनाही मास्क वारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement